Friday, December 11, 2015

"नको रहाणे"

नको रहाणे अशा ह्या जगी.

पडताच थेंब  पाण्याचा
कागद हा जणू विरघळणारा

संसार आहे  कूंपण काट्यांचे
अडकता क्षणी मरणारा

संसाराचे क्षण-क्षण चटक्यांचे
आग पेटता हा संपणारा

सांगून गेले संत कबीर हो
नाम सतगुरु हाच तारणारा

नयना(आरती) कानिटकर
११/१२/२०१५

Wednesday, September 2, 2015

चि.------
अ.उ.आशिर्वाद
  तुझा  राखी निमित्य येण्याचामेल मिळाला होता .खूप आनंद वाटला की नुसते फोन वर वरपांगी आमंत्रण देण्या पेक्षा तु मला मेल केली,हे पण पत्राच स्वरुप नाही का :) ,थोड व्यावसायिक असुदेत पण लगेच पोहोचण्याची हमी  भरणार.असो.
     काही पारिवारिक व व्यवसायिक जिम्मेवारी मुळे मला येणे अशक्य  होते पण क्षणो-क्षणी आपली लहानपणी साजरी झालेली ती पहिली  राखी आठवत राहिली.तुझ्यात नी माझ्यात ७ वर्षाचे अंतर,तुझा जन्म मार्च मधला व राखी आगस्ट मधे आली .तु जेम-तेम ४ महिन्याचा असावा. बाबांनी आम्हाला म्हण्जे मला व माईला चाँदी ची राखी आणुन दिली होती तुला बांधायला.आई-आजी ने नारळ खवून वड्या व नारळी भात केला होता.
  आम्ही पण हातावर मेंदी चे ५ ठिपके लावून ,नवीन फ्राक ,पायात पैजण घालुन छूम-छूम करत घरभर नुसते मटकत फिरत होतो.
  आणी तो क्षण आला ज्याची वाट बघत होतो.आई ओवाळायचे तबक, राखी,नारळ घेऊन आली .तेवढ्यात माई ने ह्ट्ट केला मी आधी राखी बांधणार म्हणून.मग मी पण राखी बांधली.ओवाळणी म्हणून त्या वेळेत चलनात असलेल्या चौड्या पट्याच्या सैटिन रीबिन आई ने तुझ्या हातात दिल्या अम्हास द्यायला. तेव्हा दोन वेण्या घालण्याचे चलन होते.कैड्बरी वैगैरे सुद्धा माहित नव्हते.तू आंनदाने त्यच्याशिच खेळाला लागला आम्हास देईना.मग आजी मे मनवून तुझ्या कडून ती ओवाळणी दिली.
  आम्ही सुद्धा लगेच रीबिनी वेण्यांना बांधून तुझ्या नाकाशी त्यांची बांधलेली फुले गुळ्गुळ करत होते व तु खिदळून हसत होता.तो आनंद आई-बाबा व आजी च्या चेहरयावर खूलुन दिसत होता वर्ष लोटायला लागली,
 मग आई ने शिकवलेली राखी स्वत: करुन तुला बांधायला लागलो.ओवाळणी पण बदलत गेली पण चाकलेट मात्र तेव्हा ही नाही आले.
       कालांतराने  प्राथमिकता बदलल्या.पण सणाचा गोडवा तोच राहिला.आता मात्र दूर-दूर असल्याने नुसत्या आठवणी.
  आई-बाबांना पण ते दिवस आठवले की मन भरून येत असेल.असो पण तु व वहिनी त्यांचा सांभाळ उत्तम रित्या करल असल्याने आम्हाला काही काळजी नाहिच.खरे तर हिच आमची ओवाळणी पण वहिनी मात्र सगळ्या रिती-भाती संभाळते तिचे कौतुक वाखण्या जोगे आहे.लिण्यास खूब आठवणी आहेत पण आता पूर्णविराम.हेच पत्री ति.आई-बाबांना शि.शा.न. व दोघे लहानास आशिर्वाद.
तुझी ताई
-----------


Friday, August 14, 2015

मला भारत देशाचा नागरिक असल्यचा अभिमान आहे

  ''मला भारत देशाचा नागरिक असल्याचा अभिमान वाटतो / अभिमान नाही वाटत''
विषयांवर लिहिण्या आधी मी भारतीय आहे व भारतीय संविधान अनुसरूनच माझे आचरण असेल अशी मी प्रतिज्ञा करते,
कारण लिहिण्याचे-बोलण्याचे स्वातंत्र्य मिळाले  म्हणून त्याचा दूरूपयोग माझ्या भाषेतुन होऊ नये.कान सरळ हाताने पण  धरता येतो व मानेच्या मागुन हाथ नेऊन सुद्धा.------

माझा जन्म स्वातंत्र्याच्या  नंतरचा. म्हणजे एक प्रकारे स्वातंत्र्य माझ्या ताटात पकवान्ना प्रमाणे वाढले गेले,नुसते मला नव्हे तर माझ्या पिढीच्या लोकांना सुद्धा.पण त्या मागचे कष्ट ,बलिदान ह्यापिढी ने भोगले नसल्याने त्यांनी स्वातंत्र्य गृहितच धरले.असे मला वाटते.
साध्या दोन घासाच्या जेवणा करिता होणारे हजारो कष्ट मी माझ्या आजी कडून एकले आहे.ती सदा आम्हा बजावत असे पानात अन्न टाकू नका .मिठ सांडू नका नाही तर डोळ्याच्या पापणिने उचलावे लागेल,त्यावरुन कल्पना येते की आजच्या दृष्टि ने त्या कळात साध्या मिठा करिता सुद्धा बाईला किती झगडावे लागले असणार. प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष पणे भारतिय स्त्री ने सुद्धा स्वातंत्र्य प्राप्तित मोलाचे योगदान केलेले आढळते.रमाबाई रानडे,सावित्री बाई फुले ह्यांनी तर प्रत्यक्ष पणे लढा लढविला पण आपल्या कुटुंबियांचा भार आपल्या खांद्यावर घेऊन पती-पुत्र ह्यांना देशा करिता मोकळे ठेवण्यांरा स्त्रीयांनी पण अप्रत्यक्ष पणे  जास्त मोलाचे योगदान केले आहे त्यांची यादी  आपण करु शकत नाही.
अश्या पूर्वज स्त्रीयांचा  अनमोल वारसा ज्या राष्ट्रा कडून मला मिळाला त्या राष्ट्राचा मला अभिमान तर आहेच ,मी त्यांची ऋणी सुद्धा आहे.
देशाला स्वातंत्र्य मिळाल्या नंतर च्या काळात भारतातील स्त्रीया देशाचा विकास घडविण्यात हातभार लावत आहेत.साधी आकडेवारी पाहिली तर असे दिसते की भारतातील सर्वसामन्य स्त्रीया बालवाडी,अंगणवाडी,प्राथमिक शिक्षण,परिचारिका,सफाईकामगार,शेतमजूर विणकर अश्या वेगवेगळ्या कामामध्ये तर हातभार लावतच आहे,त्या पलिकडे पूर्वि पुरुषांचे वर्चस्व असलेल्या सैन्य शाखेत पण प्रवेश केला आहे.संगणक,व्यवस्थापन आदी क्षेत्रे  पण त्या हाताळत आहे.
 परंतु आता गरज आहे स्त्रीयांनी सार्वजनिक जीवनात निर्भयपणे पाउल टाकण्याची.स्त्रीयांना स्वतंत्रतेचा भरपूर वाव मिळाला पाहिजे,मिळत ही आहे .हळू-हळू त्या आपल्या लेखणीतून स्त्रीप्रश्न ,समाजप्रश्न मांडू ही लागल्या आहे पण राजनीतिक क्षेत्रात मात्र अजून मागे आहे.
आपल्याकडे भरपूर कौशल्य आणी भरपूर चिवटपणा गेली अनेक दशके जगून-तगून राहताना स्त्रीयांच्या अंगी असतेच म्हणजे असे कि इंग्लैड,अमेरिकेतील स्त्रीया थोडा जरी त्यांच्या दिनक्रमात बदल झाला तर त्यांना जड-तोड करणे कठिण जाते,परंतु भारतिय स्त्रीया जडतोड करतच जगत असतात आणि त्यातूनच त्यांच्या मध्ये एक व्यवहारिक हुशारी व ताकद आली आहे,त्या मोठी कामगिरी बजावू लागल्या आहे
पण त्यासाठी मिळणारया संधी, सोई अजुन  ही अपूरया आहे.
 स्वातंत्र्य प्राप्तिचा एव्हडा काळ लोटल्यावर ही अजुन हव्या त्या सोई ,नियम-कानून स्त्री करिता आले नाही ह्याची खंत वाटते.त्या घरा बाहेर निघाल्या,मिळवत्या झाल्या पण स्वातंत्र्य तेव्हडच मिळाले की ज्या मुळे पितृसत्तेचे सिंहासन हलता उपयोगी नाही.मानसिक  स्वातंत्र्य मिळाल्या शिवाय अजुन ही स्त्री परतंत्र आहे.
* हुंड्या करिता हुंडा निषेध अधिनियम,विवाहित महिला सपंत्ति अधिनियम जरी आले असले तरी ते अजुन अपुरे आहेत.
स्वातंत्र्याचे खरे स्वरुप स्त्री स्वातंत्र्यानेच अधिक खुलून येईल त्या साठी योग्य ते प्रयत्न होणे गरजेचे आहे.

सौ.नयना(आरती) कानिटकर


Sunday, January 25, 2015

आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

हळूच दिवा उजळला आशेचा
उमलल्या कळ्या मोगरयाच्या
दरवळला वारा पारिजाताचा
बहरला रंग  सुगंध बकुळीचा
आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

अनुभवली
 ती मंद-मंद वारयाची झुळूक
तो उन्मुक्त समुद्री किनारा
तो उगवता तेजपुंज सुर्याचा
बेभान होऊन ओंजळित भरले क्षण
आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

आठवला
उगवता तो चंद्र पोर्णिमेचा
ते संग पसरलेले तारा पुंज
तो अडिग ध्रुव तारा उत्तरे कडचा
हात एक दुसरयातघट्ट मिटलेला
आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

चल घेऊ
सोडून ते बंध व्यवसायाचे
होऊन स्वच्छंद,मुक्त श्वसनाचे
लुटू स्मित हास्य जीवनाचे
टिपू ते कण-कण आंनदाचे
आज कित्येक दिंवसांनी पुन्हा भेटलास आणि

नयना(आरती) कानिटकर
११/११/२०१४