Thursday, March 31, 2011

बाबा

बाबा बाबा निघाले कविता करायला
हातात कागद घेऊन बागेत बसायला।
तेवढ्यात बागेत जोरात वारा लगला वहायला,
आईला हाँक देऊन म्हणाले पैड आण ग कागद जपायला।
एकदाचे खूर्चीवर बसले कविता करयला,
डोक्यावर हाथ मारुन लागले हँसायला
अरे!! मी पेन तर आणलच नाही कविता लिहायला।
पेन,कागद घेऊन परत बसले लिहायला
हाता वर हात ठेऊन लागले विचार करयला
विचाराच्या चक्रात लागले फ़िरायला तेवढ्यात
विचारांचे चक्र जमीनी वर आले
कार ची किल्ली घेऊन बाहेर निघाले
अरे! अरे! बाबा काय झाले कुठे निघाले
अग आफिस मधे इन्कमटैक्स चे आपात काम आले।
आई स्वयंपाक घरात खुद्कन हँसली
बाबाची कविता कागदा वर फदकन बसली