Tuesday, August 25, 2020

*आंबट -गोड आठवणी* 

आजी आणि तारापुंज

लहान पणा पासून आम्ही आजीच्या खूप जवळ असू म्हणजे आजी शिवाय आमचे पान हालायाचे नाही. आजी काही शाळेत जाऊन तर शिकलेली नव्हती पण आजूबाजूशी चौकस बुद्धी व वाचनाची आवड .सदा काही ना काही करत असे . चौदा मुलांचा संसार खूप काटकसरी ने पाळला . कुठली ही वस्तू वाया जाऊ द्यायची नाही हा तिचा कटाक्ष . मातीच्या चुली पार ती फारच सुंदर घडवत असे आणि  लहान लहान चुली आमच्या कडून ही घडवून घेत.
जुलै -अगस्त मध्ये आमच्या कडे भूट्याचा किस होत असे.  मध्य प्रदेश च्या माळवा प्रांतात हा घरो-घरी केला जातो.
भुट्टे किसून झाल्यावर आतला कडक भाग ज्याला "माखोले" म्हणतात ते आजी वाळवून ठेवे.  तेच माखोले छोट्या चुलीत पेटवून ती आम्हाला रोज सकाळी चहा करून देई .
त्या काळी आमचे घर  भाड्याचे छोटे से . एक स्वयंपाकघर व एक खोली वरच्या भागात व खाली दोन छोट्या खोल्या. ती आम्हा  दोघी बहिणींना घेऊन  खालच्या खोलीत झोपत असे. तिला बिछान्या वर स्वच्छ पांढरी चादर लागे  फाटकी असली तर ती त्याला टिपण घाले पण नवीन चादरी चा आग्रह नसे . अशी साधी शी माझी आजी खूप काही गुणांनी नटलेली.
आकाशातले तारे ती अचूक ओळखायची .आम्हाला ही शिकवत असे "हे सप्तऋषी , हा धुवतारा सदा उत्तरे कडे उगवणारा. हे नक्षत्रांचे गुच्छ . सप्तर्षी तारकासमुहातील प्रमुख सात प्रमुख तार्‍यांपैकी पहिल्या दोन तार्‍यांना जोडून सरळ रेषा आखल्यास ती रेषा सरळ उत्तर ध्रुवतार्‍याकडे जाईल.मृग तारकासमुहामध्ये असलेले मृगाचे तोंड नेहमीच उत्तर दिशा दर्शविते. सिंह तारकासमुहामध्ये असलेले सिंहाचे तोंड नेहमीच पश्चिम दिशा दर्शविते. असे अनेक प्रकार ती सांगत असे -शिकवत असे .

एकदा काय झाले आमच्या घरचे अलार्म घड्याळ बंद पडले. छोटे गावं लौकर सुधारून मिळाले नाही.  आम्हाला सकाळी अभ्यासाला उठवणे,चहा करून देणे हा तिचा रोजच्या  उपक्रमात खंड पडला नाही . आमच्या घरा  समोर एक बोरी चे झाड होते ती तिची खूण त्यावर येणारे तारे बघून ती अचूक वेळ सांगे त्यामुळे आमची दिनचर्या काही बदलली नाही . तिचे वय साधारण ७५-७६ असणार नजर कमजोर झाली होती पण चष्मा लावायला तयार नव्हती .
एकदा नजर चुकीने तिनी बोरा वरचे तारपुंज बघून आम्हाला अभ्यासाला उठवले."उठा लेकींनो चार वाजून गेलेत .तास -दीड तास अभ्यास होईल. उठा लवकर . त्या दिवशी मी पहिल्यांदा उठाचा कंटाळा केला होता . तर डोक्यावर हात फिरवत म्हणे उठ बेटा दहा दिवसावर परीक्षा आली. आम्ही दोघी बहिणी उठून वर सांगितल्या प्रमाणे आजी ने मखोळे जाळून आमच्या करता चहा करून ठेवला होता तो प्यायलो व अभ्यासाला बसलो. ती आमच्या जवळ बसून काही ना काही शिवत असे . झालर लावलेल्या पिशव्या सदा नाव-नवीन तयार करत असे. त्यावेळे प्लास्टिक बैग्स कुठे होत्या . 
अभ्यास करत दोन तास व्हायला आले तरी दिवस काही उजाडे ना. आम्हाला ही कंटाळा यायला लागला म्हणता आजी ने चुलीवर तापवलेले पाणी घेऊन आंघोळी पण करून झल्या पण सूर्य काही उगवेना.
बाबांना आमच्या खटपटी मुळे जाग आली. ते वरच्या माडी वरून खाली आले ,त्यांना वाटले कोणाची तरी तब्बेत बिघडली बहुतेक .खाली येऊन बघतात तर आम्ही शाळे करता तैयार . आमचे बाबा त्याच्या आईला म्हणजे आजी ला वहिनी म्हणत असे .
"अग !वहिनी अजून तर फक्त चार वाजलेत .अग! इतक्या लौकर तयार केलास  मुलिंना ."
आजी एकदम ओशाळल्यागत झाली .अरे! बहुतेक मीच चुकले आज ते रोहिणी नक्षत्र बोरी वर दिसले...मला वाटले चार वाजलेत . म्हणजे आम्ही रात्री चे एक-दीड लाच उठलो असणार . "जा बाबू! तू जाऊन झोप मी बघते .परत उठवते साढे  सहाला " आम्हाला जवळ घेत म्हणाली .
आम्ही तिघी झोपी गेलो .मग तर मज्जाच झाली जी झोप लागली ती सरळ आठ ला उघडली. तेही बाबांनी परत दार ठोठावल्यावर . एरवी साडे पांच ला जोरात रेडियो लावून उठवणारे आज उबरठ्या वर हंसत बसले होते .
आमची त्या दिवशी ची शाळा चुकली पण मग आजी च्या हाताची शेगडी वरची गरम-गरम पोळी त्यावर तूप -पिठी साखर खालून जी खाल्ली त्याची  चव आजचे कुठलेसे पदार्थ देऊ शकत नाही.
अश्या माझ्या आजी सोबतच्या खूप गोड-गोड आठवडी तिला जाऊन जवळ-जवळ चाळीस वर्षे झाली तरी नजरे समोर तश्याच. 
©नयना (आरती ) कानिटकर 

Thursday, July 28, 2016

आजी ची आठवण

माझी आजी


पहूडले होते थकून-भागून
अपरान्ह समयी
लगेच डोळा लागला बहूदास्वप्नात कदाचित,
मी गेले असेन बालवयात,
तरंगले ते सारे दृष्य,जेंव्हा
मी आणायची धूण धुवू
विहीरी वरुन, तिच्या
नऊवारी लुगड्या सह
वाळत घालायचे उँच दोरी वर
दांडी ने सारत
 गोळा भरायचा  माझ्या
बारक्या  दंडात
ती बघत असायची गूप-चूप
माझे श्रम, आणि
आईने दिलेल्या दुस-या चहातले
दोन घोट चुपचाप राखायची
माझ्या करिता
पदरा आड लपवून, आईच्या नकळत
फ़िरवायची पाठी वरुन
हात प्रेमाने...
अचानक हाक ऐकू आली
आईsss काय ग! किती दमलिस
कशाला ग! काढतेस ढिग भर  कामे,
हे घे! दोन घोट चहा पी
केलाय मी, आल घालून
पाठी वर हात फिरवत
चहाचा कप पूढे केला लेकी ने
तिच्या चेह-यात चक्क आजीच दिसली
आनंदाश्रू येऊन ठाकले,
माझ्या गालांवर
खरंच
मृत्यु होतो तो शरीरांचा
आठवणी जीवंत असतात
पिढ्यांन  पिढ्या

नयना(आरती) कानिटकर
२८/०७/२०१६



Friday, January 29, 2016

अनुवाद - मिलाकात की उम्र

आपण ओळखत नाहीं
एक दुस~याला, तरी
हवेचा गंध दरवळतो
एक विशिष्ठ गंधा ने
तुझ्या स्पर्शा ने
उमलतात गुलमोहर, पण
माझ्या जवळ येताच
पाकळ्या पडतात मोकळ्या
आपण प्रेमी नाहीं
ना कधी स्वप्नात ही एकमेकांच्या
आपण भेटलो ही नाहीं,आश्या ठिकाणी
जिथे फक्त शांतता
आणी उफ़ाण प्रेमाच्या लाटांची
चंद्र कधीच डोकावला नाहीं
तुझ्या नी माझ्या मनात
चकोरा सारखे प्रेमगीत ही
नाही,गायले कधी
तुझी-माझी काया उभी आहे
अमोरा-समोर गरजे प्रमाणे
उत्तेजनाच्या सर्वोच्च बिंदू वर
एक घंटी धोक्याची
झंकारुन परतायचे नेहमी
विसरुन जायला एक दूस~या सवे
प्रत्येक भेटी नंतर
आयुष्याच्या उत्तरार्धा प्रमाणे
----मूळ कविता प्रदीप मिश्र    
अनुवाद-नयना(आरती)कानिटकर


Friday, January 8, 2016

भरारी

म्हणूदेत कोणाला
काही  ही  कि ,तो
दगा आहे
आहे लबाडी
तू फसवणूक करुन उडतोय
पण असू देत
हलव तो पिंजरा
दे ती डाळिंबी उडवून
त्या सोन्याच्या वाटितली
असू देत
तो ताप रवि चा  किंवा  तेज वारा
तू! उड
तू! घे भरारी माझ्या राघू

नयना(आरती) कानिटकर
०८/०१/२०१६

Friday, January 1, 2016

स्त्री

 येते माझ्या स्वप्नात
ती सतत रडणारी
मनातल्या मनात
थरथरणारी वात जशी
येते माझ्या पर्यंत ,उपाशी
कंटाळलेली,उपेक्षित
तिचे ते हुंदके
माझ्या ही घश्यात जा-ये करतात
पण मी नाही उतरवू शकलो
ते हुंदक्यांचे शब्द
 कवितेत
कुठला ही अनुवाद पण नाही घडला
तिच्या स्तब्ध डोळ्याततून
उमटत नाहीं
प्रेम-प्रणयांचे दृश्य
असंख्य दरवाज्यातून कडेकोट बंद आहे
तिच्या दु:खाचे गाठोडे
आपल्या चहूँ कडे असंख्य भिंति उभ्या केल्यात  तिन
तिचे रडणे फ़क्त स्वप्नातच
मला आवडेल ते आवरायला
तिचे हुंदके,पुसायला अश्रु
काढायचे आहे पडद्याच्या बाहेर
आप्ले रडू आवरणारी ती
जर भेटली मला दिवसा कधी,तर
कसे ओळखु  मी तिला
जी दिवसा करते फक्त याचना
व्रत,उपवास आणी प्रार्थने ने
कुठेच का तिचा नैवेद्य स्वीकार्य होत नही
मग अचानक अदृश्य होते ती
माझ्या स्वप्नातून
भूक व वेदना झोपवतात तिला अन
मला ही ,सकाळ्च्या थंड हवेत
थबकलेले तिचे अश्रु
पक्ष्यांची चिव-चिव
तीचे रुदन गीत
आकाशात आकरले जाते जणू
मी स्तब्ध ऐकत बसतो  जसे
पृथ्वी चा हाहाकार.

Friday, December 11, 2015

"नको रहाणे"

नको रहाणे अशा ह्या जगी.

पडताच थेंब  पाण्याचा
कागद हा जणू विरघळणारा

संसार आहे  कूंपण काट्यांचे
अडकता क्षणी मरणारा

संसाराचे क्षण-क्षण चटक्यांचे
आग पेटता हा संपणारा

सांगून गेले संत कबीर हो
नाम सतगुरु हाच तारणारा

नयना(आरती) कानिटकर
११/१२/२०१५

Wednesday, September 2, 2015

चि.------
अ.उ.आशिर्वाद
  तुझा  राखी निमित्य येण्याचामेल मिळाला होता .खूप आनंद वाटला की नुसते फोन वर वरपांगी आमंत्रण देण्या पेक्षा तु मला मेल केली,हे पण पत्राच स्वरुप नाही का :) ,थोड व्यावसायिक असुदेत पण लगेच पोहोचण्याची हमी  भरणार.असो.
     काही पारिवारिक व व्यवसायिक जिम्मेवारी मुळे मला येणे अशक्य  होते पण क्षणो-क्षणी आपली लहानपणी साजरी झालेली ती पहिली  राखी आठवत राहिली.तुझ्यात नी माझ्यात ७ वर्षाचे अंतर,तुझा जन्म मार्च मधला व राखी आगस्ट मधे आली .तु जेम-तेम ४ महिन्याचा असावा. बाबांनी आम्हाला म्हण्जे मला व माईला चाँदी ची राखी आणुन दिली होती तुला बांधायला.आई-आजी ने नारळ खवून वड्या व नारळी भात केला होता.
  आम्ही पण हातावर मेंदी चे ५ ठिपके लावून ,नवीन फ्राक ,पायात पैजण घालुन छूम-छूम करत घरभर नुसते मटकत फिरत होतो.
  आणी तो क्षण आला ज्याची वाट बघत होतो.आई ओवाळायचे तबक, राखी,नारळ घेऊन आली .तेवढ्यात माई ने ह्ट्ट केला मी आधी राखी बांधणार म्हणून.मग मी पण राखी बांधली.ओवाळणी म्हणून त्या वेळेत चलनात असलेल्या चौड्या पट्याच्या सैटिन रीबिन आई ने तुझ्या हातात दिल्या अम्हास द्यायला. तेव्हा दोन वेण्या घालण्याचे चलन होते.कैड्बरी वैगैरे सुद्धा माहित नव्हते.तू आंनदाने त्यच्याशिच खेळाला लागला आम्हास देईना.मग आजी मे मनवून तुझ्या कडून ती ओवाळणी दिली.
  आम्ही सुद्धा लगेच रीबिनी वेण्यांना बांधून तुझ्या नाकाशी त्यांची बांधलेली फुले गुळ्गुळ करत होते व तु खिदळून हसत होता.तो आनंद आई-बाबा व आजी च्या चेहरयावर खूलुन दिसत होता वर्ष लोटायला लागली,
 मग आई ने शिकवलेली राखी स्वत: करुन तुला बांधायला लागलो.ओवाळणी पण बदलत गेली पण चाकलेट मात्र तेव्हा ही नाही आले.
       कालांतराने  प्राथमिकता बदलल्या.पण सणाचा गोडवा तोच राहिला.आता मात्र दूर-दूर असल्याने नुसत्या आठवणी.
  आई-बाबांना पण ते दिवस आठवले की मन भरून येत असेल.असो पण तु व वहिनी त्यांचा सांभाळ उत्तम रित्या करल असल्याने आम्हाला काही काळजी नाहिच.खरे तर हिच आमची ओवाळणी पण वहिनी मात्र सगळ्या रिती-भाती संभाळते तिचे कौतुक वाखण्या जोगे आहे.लिण्यास खूब आठवणी आहेत पण आता पूर्णविराम.हेच पत्री ति.आई-बाबांना शि.शा.न. व दोघे लहानास आशिर्वाद.
तुझी ताई
-----------