Thursday, July 28, 2016

आजी ची आठवण

माझी आजी


पहूडले होते थकून-भागून
अपरान्ह समयी
लगेच डोळा लागला बहूदास्वप्नात कदाचित,
मी गेले असेन बालवयात,
तरंगले ते सारे दृष्य,जेंव्हा
मी आणायची धूण धुवू
विहीरी वरुन, तिच्या
नऊवारी लुगड्या सह
वाळत घालायचे उँच दोरी वर
दांडी ने सारत
 गोळा भरायचा  माझ्या
बारक्या  दंडात
ती बघत असायची गूप-चूप
माझे श्रम, आणि
आईने दिलेल्या दुस-या चहातले
दोन घोट चुपचाप राखायची
माझ्या करिता
पदरा आड लपवून, आईच्या नकळत
फ़िरवायची पाठी वरुन
हात प्रेमाने...
अचानक हाक ऐकू आली
आईsss काय ग! किती दमलिस
कशाला ग! काढतेस ढिग भर  कामे,
हे घे! दोन घोट चहा पी
केलाय मी, आल घालून
पाठी वर हात फिरवत
चहाचा कप पूढे केला लेकी ने
तिच्या चेह-यात चक्क आजीच दिसली
आनंदाश्रू येऊन ठाकले,
माझ्या गालांवर
खरंच
मृत्यु होतो तो शरीरांचा
आठवणी जीवंत असतात
पिढ्यांन  पिढ्या

नयना(आरती) कानिटकर
२८/०७/२०१६



Friday, January 29, 2016

अनुवाद - मिलाकात की उम्र

आपण ओळखत नाहीं
एक दुस~याला, तरी
हवेचा गंध दरवळतो
एक विशिष्ठ गंधा ने
तुझ्या स्पर्शा ने
उमलतात गुलमोहर, पण
माझ्या जवळ येताच
पाकळ्या पडतात मोकळ्या
आपण प्रेमी नाहीं
ना कधी स्वप्नात ही एकमेकांच्या
आपण भेटलो ही नाहीं,आश्या ठिकाणी
जिथे फक्त शांतता
आणी उफ़ाण प्रेमाच्या लाटांची
चंद्र कधीच डोकावला नाहीं
तुझ्या नी माझ्या मनात
चकोरा सारखे प्रेमगीत ही
नाही,गायले कधी
तुझी-माझी काया उभी आहे
अमोरा-समोर गरजे प्रमाणे
उत्तेजनाच्या सर्वोच्च बिंदू वर
एक घंटी धोक्याची
झंकारुन परतायचे नेहमी
विसरुन जायला एक दूस~या सवे
प्रत्येक भेटी नंतर
आयुष्याच्या उत्तरार्धा प्रमाणे
----मूळ कविता प्रदीप मिश्र    
अनुवाद-नयना(आरती)कानिटकर


Friday, January 8, 2016

भरारी

म्हणूदेत कोणाला
काही  ही  कि ,तो
दगा आहे
आहे लबाडी
तू फसवणूक करुन उडतोय
पण असू देत
हलव तो पिंजरा
दे ती डाळिंबी उडवून
त्या सोन्याच्या वाटितली
असू देत
तो ताप रवि चा  किंवा  तेज वारा
तू! उड
तू! घे भरारी माझ्या राघू

नयना(आरती) कानिटकर
०८/०१/२०१६

Friday, January 1, 2016

स्त्री

 येते माझ्या स्वप्नात
ती सतत रडणारी
मनातल्या मनात
थरथरणारी वात जशी
येते माझ्या पर्यंत ,उपाशी
कंटाळलेली,उपेक्षित
तिचे ते हुंदके
माझ्या ही घश्यात जा-ये करतात
पण मी नाही उतरवू शकलो
ते हुंदक्यांचे शब्द
 कवितेत
कुठला ही अनुवाद पण नाही घडला
तिच्या स्तब्ध डोळ्याततून
उमटत नाहीं
प्रेम-प्रणयांचे दृश्य
असंख्य दरवाज्यातून कडेकोट बंद आहे
तिच्या दु:खाचे गाठोडे
आपल्या चहूँ कडे असंख्य भिंति उभ्या केल्यात  तिन
तिचे रडणे फ़क्त स्वप्नातच
मला आवडेल ते आवरायला
तिचे हुंदके,पुसायला अश्रु
काढायचे आहे पडद्याच्या बाहेर
आप्ले रडू आवरणारी ती
जर भेटली मला दिवसा कधी,तर
कसे ओळखु  मी तिला
जी दिवसा करते फक्त याचना
व्रत,उपवास आणी प्रार्थने ने
कुठेच का तिचा नैवेद्य स्वीकार्य होत नही
मग अचानक अदृश्य होते ती
माझ्या स्वप्नातून
भूक व वेदना झोपवतात तिला अन
मला ही ,सकाळ्च्या थंड हवेत
थबकलेले तिचे अश्रु
पक्ष्यांची चिव-चिव
तीचे रुदन गीत
आकाशात आकरले जाते जणू
मी स्तब्ध ऐकत बसतो  जसे
पृथ्वी चा हाहाकार.