Wednesday, September 2, 2015

चि.------
अ.उ.आशिर्वाद
  तुझा  राखी निमित्य येण्याचामेल मिळाला होता .खूप आनंद वाटला की नुसते फोन वर वरपांगी आमंत्रण देण्या पेक्षा तु मला मेल केली,हे पण पत्राच स्वरुप नाही का :) ,थोड व्यावसायिक असुदेत पण लगेच पोहोचण्याची हमी  भरणार.असो.
     काही पारिवारिक व व्यवसायिक जिम्मेवारी मुळे मला येणे अशक्य  होते पण क्षणो-क्षणी आपली लहानपणी साजरी झालेली ती पहिली  राखी आठवत राहिली.तुझ्यात नी माझ्यात ७ वर्षाचे अंतर,तुझा जन्म मार्च मधला व राखी आगस्ट मधे आली .तु जेम-तेम ४ महिन्याचा असावा. बाबांनी आम्हाला म्हण्जे मला व माईला चाँदी ची राखी आणुन दिली होती तुला बांधायला.आई-आजी ने नारळ खवून वड्या व नारळी भात केला होता.
  आम्ही पण हातावर मेंदी चे ५ ठिपके लावून ,नवीन फ्राक ,पायात पैजण घालुन छूम-छूम करत घरभर नुसते मटकत फिरत होतो.
  आणी तो क्षण आला ज्याची वाट बघत होतो.आई ओवाळायचे तबक, राखी,नारळ घेऊन आली .तेवढ्यात माई ने ह्ट्ट केला मी आधी राखी बांधणार म्हणून.मग मी पण राखी बांधली.ओवाळणी म्हणून त्या वेळेत चलनात असलेल्या चौड्या पट्याच्या सैटिन रीबिन आई ने तुझ्या हातात दिल्या अम्हास द्यायला. तेव्हा दोन वेण्या घालण्याचे चलन होते.कैड्बरी वैगैरे सुद्धा माहित नव्हते.तू आंनदाने त्यच्याशिच खेळाला लागला आम्हास देईना.मग आजी मे मनवून तुझ्या कडून ती ओवाळणी दिली.
  आम्ही सुद्धा लगेच रीबिनी वेण्यांना बांधून तुझ्या नाकाशी त्यांची बांधलेली फुले गुळ्गुळ करत होते व तु खिदळून हसत होता.तो आनंद आई-बाबा व आजी च्या चेहरयावर खूलुन दिसत होता वर्ष लोटायला लागली,
 मग आई ने शिकवलेली राखी स्वत: करुन तुला बांधायला लागलो.ओवाळणी पण बदलत गेली पण चाकलेट मात्र तेव्हा ही नाही आले.
       कालांतराने  प्राथमिकता बदलल्या.पण सणाचा गोडवा तोच राहिला.आता मात्र दूर-दूर असल्याने नुसत्या आठवणी.
  आई-बाबांना पण ते दिवस आठवले की मन भरून येत असेल.असो पण तु व वहिनी त्यांचा सांभाळ उत्तम रित्या करल असल्याने आम्हाला काही काळजी नाहिच.खरे तर हिच आमची ओवाळणी पण वहिनी मात्र सगळ्या रिती-भाती संभाळते तिचे कौतुक वाखण्या जोगे आहे.लिण्यास खूब आठवणी आहेत पण आता पूर्णविराम.हेच पत्री ति.आई-बाबांना शि.शा.न. व दोघे लहानास आशिर्वाद.
तुझी ताई
-----------