"साखळी "
भाग्यवान समजायची ती स्वतःला 
मिळाला होता सहवास तिला 
दोंन्ही कडील आज्यांचा
त्याकाळी धर्मभीरू कधीच नव्हत्या 
एक होती 
जन्मतात सुरेख साच्यात घडलेली, 
तर दुसरी होती कष्ट करून दणकट अंग मिळवलेली
तिच्या लहानपणी 
एक सांगायची गोष्ट रात्री झोपतांना
राजा-राणी ची 
एक होता राजा, त्याला दोन राण्या होत्या 
एक आवडती , एक नावडती..
तर दुसरी सांगायची 
महिषासुर मर्दिनी ची कथा 
त्या कथांचे बीज पण रोवले गेले होते 
डी.एन.ए मधून 
पुढच्या पिढीत , काही से तसेच तर काही से बदलून 
मग 
ते !  सांगायचे त्यांच्या व्यस्ततेतून ही
अधे मधे
राणी दुर्गावती ची कथा , तर कधी शिवाजींचे हल्लेबोल
पण 
तिने !  मात्र कथा सांगायची सोडूनच दिली
ती स्वतः शी झगडत राहिली
आवडती -नावडती राणी घ्या कथेत
आपले स्व टिकवायला
ते जीन्स  परत
काही  से बदलून 
तर काही से तसेच 
छापील झाल्या सारखे उतरले  तिच्यात
आता तिची पिढ़ी झगडते आहे भ्रमिता सारखी 
त्या डी.एन.ए च्या साखळी शी
कारण 
महिषासुरमर्दिनी व राणी दुर्गावती चा डी.एन.ए 
शंभर टक्क्याने वरचढ़़  ठरला आहे  तिच्या पिढ़ित 
पुढच्या  पिढ़ीत मात्र 
तिने रोवले आहे 
स्वतंत्र अस्तित्वाचे बीज 
बघू यात आता डी.एन.ए ची साखली 
कुठले वळण घेते
©नयना (आरती)कानिटकर
 
