Tuesday, November 27, 2012

आपण ठरवायचे"

आपण कसे जगायचे
हसत खिदळत का,नाक मुरडत
आपले आपणच ठरवायचे

चिंता दुख: किती उगाळायचे
उद्याच्या चिंतेत आज का मरायचे
आपले आपणच ठरवायचे

आयुष्यात सुख-दुख: हे यायचेच
दुखात ही सुख कसे मनायचे
आपले आपणच ठरवायचे

मानवेतर प्राणी ही जगत असतात
पण आपण स्वाभिमानाने कसे जगायचे
आपले आपणच ठरवायचे

प्रेम जिव्हाळा नाती-गोती
यात आपण किती अडकायचे
आपले आपणच ठरवायचे

Thursday, September 27, 2012

आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

तुझे स्वप्न आकाशाच्या पलिकडे वाहु दे
प्रयत्नाना कुठे ही कमी पणा नसू दे
कंबर कसुन मेहनती चा कल असू दे
स्मितहास्य चेहरयावर सदा बसू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

अभ्यासात उत्तुंग शिखर गाठण्याचा प्रयत्न असू दे
व्यवहारात असमानतेचा सल नसू दे
व्यवस्थापनाची पुर्णपणे जिजिविषा असू दे
आत्म सम्मानाचा तुझ्या कडे अभिमान असू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

बाल्यावस्थेतून युवावस्थे कडे पदार्पण होऊ दे
बाहेर वावरताना अधिरपणा अजिबात नसू दे
स्वभावात चारित्र्याचे श्रेष्ठबळ असू दे
विचारात संस्कारांचा निष्णात जोर असू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

अर्थिक जिजिविषेत सदा समाधान असू दे
पैसा अडक्यांची मुळीच गुर्मी नसू दे
खर्चा बरोबर बचतीचा प्रयत्न असू दे
अचल संपत्ति वर तब्याचा कल असू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

सगळ्यांशी संबंध जोडण्याचा प्रयत्न असू दे
खांदयावर  हाथ ठेऊन बोलण्याचा अधिकार कोणा नसू दे
समाजात वावरताना शब्दावली गोड असू दे
स्वश्रेष्ठतेच्या जबाबदारीची जाणीव असू दे
आकाशात उडताना पाय जमिनीवर असू दे

Monday, July 16, 2012

नव नवीन नित शोधू

नव नवीन नित शोधू
कधी उमलू,बहरू,कोमेजू
फांदीवर वेली शब्दांच्या
आपूलकिने बोलू!!!!!!!
                                 अनुभवले क्षण आनंदाचे
                                 भरभरुन ओसंडून वाहू
                                 मैफिलीत खुल्या गप्पांच्या
                                 आपूलकिने बोलू!!!!!!!
पोटलितील सुख दु:खाचे
अतित आंनदाने वाहू
पायवाट जशी शब्दाची
आपूलकिने बोलू!!!!!!!
                                  क्षण अनमोल जीवनाचे
                                   निसटते हातातून वाळू
                                  मनमोकळे पणाने अन
                                   आपूलकिने बोलू!!!!!!!
नतमस्तक मी आयुष्याशी
ध्येय शिखराचे ठेवू
शब्दकोश विनयचा अन
 आपूलकिने बोलू!!!!!!!