जीवनाच्या या क्षणाला
मी फक्त ’मीच’ असावे
नको तो शिक्कामोर्बत
नांव किंवा अण्णावाचां
नको तो जात-पात वा धर्माचा
नको अता ते दिर्घ-र्ह्स्व
आता फक्त ’मीच’ असावे
नको अता ती आई वा
पत्नी च्या कर्तव्या ची धांव
नको अता ते ऋणानुबंध
नको ती संपत्ति व माया
साठीच्या घरात पाऊल ठेवता
मी फक्त ’मीच’ असावे
खूप अनुभवले सुखाचे क्षण
कष्ट आणी कामाचे पण
जगता आगळे आयुष्याचे क्षण
मी फक्त ’मीच’ असावे